savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १० मार्च, २०२३

तंत्रज्ञानाच्या या युगापर्यंत स्त्रीयत्त्वाचा प्रवास....

"तंत्रज्ञानाच्या या युगापर्यंत स्त्रीयत्त्वाचा प्रवास....!"

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 



        महिलांचे वर्चस्व हे प्रत्येक क्षेत्रात दिसून येत असले तरी महिलांना त्यांचे अधिकार हे सहजासहजी मिळाले नाही. सतत हसत नात्यांची रांगोळी रंगीबिरंगी रंगाने सजवत राहिली.
       तिचा प्रवास निसर्ग नियमानुसार कधी झालाच नाही. तिचा प्रवास संघर्षाचा.... तिचा प्रवास आशा आकांक्षा धुळीत मिळविणारा..... तिचा प्रवास फक्त स्त्रीयत्वाच्या न फुललेल्या फुलांसारखा.....!!

(A woman is an idol of sacrifice.  A woman is just a giver.  To take is a term of insult, secondary honor and responsibility of duty.)

         स्त्री म्हणजे त्याग मूर्ती. स्त्री म्हणजे फक्त देणारी. घेणे म्हणजे अपमानाचे शब्द,दुय्यम सन्मान आणि कर्तव्याची जबाबदारी.

        आधी काळापासून स्त्रियांच्या वाटेला हेच आले आहे. आदिम काळापासून ते आधुनिक काळाचा विचार केल्यास स्त्रियांमध्ये खूपच परिवर्तन झालेले आहे. या परिवर्तनाचे खरे मूळ आहे, शिक्षण, लोकशाही ,आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान, खुली मुक्त व्यवस्था, स्त्रियांची मानसिक समज आणि कर्तव्य जबाबदारी याची जाणीव.
स्त्रियांचा आजपर्यंत झालेला प्रवास हा पण थोडक्यात जाणून घेऊया

1. आदिमकाळ .primordial time :-

          आदिम समाज हा रानटी अवस्थेमध्ये होता. त्या काळात पुरुष स्त्रियांचे फक्तत शोषण करत होते. पुरुष स्त्री व मुलांचे संगोपन करत नसत. स्त्री कुठल्यातरी वस्तूंसारखे वापरले जात असे.
        त्यांचा जीवनावश्यक वस्तूंचा विचार केला जात नसे. त्यांना नेहमी दुय्यम दर्जाचे वागणूक दिले जात.  पण हा प्रवास अगदी सुरुवातीचा होता. 
        तरीसुद्धा स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जात होता. पुरुष शिकार करून आपली उपजीविका भागवीत असे.

      समाज बदलत गेला समाजाची प्रगती होत गेली. स्त्रियांनी याबद्दल त्या समाजात आपले योगदान योग्य पद्धतीने दिले. तरी पण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही.


(1.primordial time :-
 Primitive society was in a barbaric state.  At that time men were just exploiting women.  Men did not take care of women and children.  A woman was used as a commodity.
       They were not considered as necessities of life.  They were always treated as second class.  But this journey was just the beginning.
 However, women were given secondary status.  Men earned their living by hunting.

 Society was changing, society was progressing.  Women have contributed to that society in a proper way.  However, the attitude towards women has not changed.)



2. प्राचीन काळ(Ancient Times):-

        प्राचीन भारतीय स्त्रियांचे कर्तृत्व भक्ती तत्त्वज्ञान कविता काव्य संस्कृत मध्ये दिसते. तसेच इतर शास्त्रामध्येही त्या पारंगत असताना दिसतात. 
       प्राचीन समाजाने स्त्रियांचे अस्तित्व मान्य केले. त्यांना मान दिला. सन्मान दिला. तरीपण खूप कमी स्त्रियांना ही संधी मिळाली.
         ज्यांना ही संधी मिळाली त्यांनी त्या संधीचे सोने केले आणि स्त्री ही स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे दाखवून दिले.
        आज कर्तबगार स्त्रियांची यादी मोठी आहे.  स्त्रियांच्या संधींना आकाशीची ही सीमा नाही.  
          प्राचीन काळ स्त्रीला हवे असणारे सर्व स्वातंत्र्य मिळाले. प्राचीन काळापासून समाज व्यवस्थेचा मूलभूत आधार असलेली स्त्री समाज व्यवस्थेचा प्रमुख भाग होऊ शकली नाही.
         एका बाजूला स्त्रियांचे धर्माधिष्ठित गौरवीकरण व दुसऱ्या बाजूला समाजात प्रत्यक्ष दुय्यम स्थान मिळाले. त्यांचे शोषण झाले. हा विरोधाभास प्राचीन काळातील स्त्रियांच्या प्रवासात दिसतो.  

(2. Ancient Times:-

 The achievements of ancient Indian women appear in devotional philosophy poetry poetry Sanskrit.  Also, they are seen in other sciences as well.
 Ancient societies accepted the existence of women.  Respected them.  Honored.  However, very few women got this opportunity.
 Those who got this opportunity took advantage of it and showed that woman is a personification of freedom.
 Today the list of accomplished women is long.  The sky is not the limit for women's opportunities.
 In ancient times women got all the freedom they wanted.  Women, who were the mainstay of the social system since ancient times, could not be a prominent part of the social system.
 On one side, religious glorification of women and on the other side, they got a secondary position in the society.  They were exploited.  This contrast can be seen in the journey of women in ancient times.)



3. वैदिक काळ /Vedic Period :-

         भारतीय शिक्षण पद्धतीचा उगम हा वेद अध्ययनापासून झाला. वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. वैदिक काळ दोन भागांमध्ये विभागला गेला.
1. पूर्व वैदिक काळ 
2. उत्तर वैदिककाळ 
            वैदिक काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती चांगली होती. स्त्रियांना शिक्षण, संपत्ती, विवाह, जोडीदार निवडण्याचा अधिकार इत्यादी होता. हातावर मोजण्याइतके अधिकाऱ्याचे स्वरूप मिळाले असले तरी उत्तर वैदिक काळापासून स्त्रियांवर बंधने लादली गेली.
       त्यांचे अधिकार काढून घेतले गेले. मनुस्मृतीने तर स्त्रियांवर कडक निर्बंध लादले. मनुस्मृतीने खऱ्या अर्थाने समाजव्यवस्था बदलवून टाकली.
       चातुर्यवर्ण व्यवस्था समाजामध्ये घट्ट रोवली गेली आणि यात खऱ्या अर्थाने पिसली गेली ती स्त्री.
        बौद्ध काळात तिचा विकास होत गेला. स्त्रियांना सुरक्षितता प्रधान केली गेली. वैदिक काळात ज्या स्त्रीला घराची स्वामिनी मानले जात असे.(It developed during the #Buddhist period.  Women's safety was prioritized.  In Vedic times the woman who was considered as the mistress of the house.)
        ऋग्वेदकाळात मुलींवर उपनयन संस्कार केले जात असे. रामायण महाभारत काळात उच्चवर्णीय स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. त्याचे अनेक उदाहरण इतिहासामध्ये आहे.
        वैदिक काळ स्त्रियांसाठी सुरक्षित होती. गुप्ता काळामध्ये स्त्रियांना युद्ध कला आणि क्षत्रिय कला शिकविला जात असे.
        स्त्रियांवर कडक निर्बंध असले तरी आदर्श जीवनाचे परिभाषा वैदिक काळात स्त्रियांच्या वाटेला आलेली आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा भारतीय समाजामध्ये खऱ्या अर्थाने वैदिक काळात रोवली गेली आहे.  


( 3:- Vedic Period :-

 The Indian education system originated from the study of the Vedas.  In Vedic times, women had the right to education.  The Vedic period was divided into two parts.
 1. Pre-Vedic Period
 2. Northern Vedic Period

             The condition of women was better in Vedic times.  Women had the right to education, property, marriage, choice of spouse etc.  
         Even though they have received the form of officers to be counted on the hand, restrictions have been imposed on women since the post-Vedic period.
 Their rights were taken away.                           Manusmriti even imposed strict restrictions on women.  Manusmriti really changed the social order.
       The Chaturyavarna system was firmly planted in the society and the woman was truly crushed by it.
         It developed during the Buddhist period.  Women's safety was prioritized.  In Vedic times the woman who was considered as the mistress of the house.

          Upanayana rites were performed on girls during the Rigvedic period.  During Ramayana and Mahabharata upper caste women had the right to education.  There are many examples of this in history.

         Vedic times were safe for women.  During the Gupta period, women were taught martial arts and Kshatriya arts.
             Although there are strict restrictions on women, the definition of an ideal life has come to women in the Vedic period.  The dignity of women in Indian society is truly rooted in the Vedic period. )



4. मध्ययुगीन काळ /Medieval Period :-

      मध्ययुगन काळात स्त्रियांना मानाचे स्थाान होते. त्यांंना दुय्यम नागरिक म्हणून मान्यता मिळालेली होती. स्त्रियांच्या राहणीमानावरून त्यांच्या गरजा विचारात घेतल्या जात असे. व्यवसायानुसार त्यांच्याकडे पाहिले जात असे.              मध्ययुगीन काळाच्या चातुर्यवर्णव्यवस्था असली तरी स्त्रियांना त्यांचे अधिकार होते. स्त्रियांचे लैंगिक शोषण कमी प्रमाणात होते. तरी पण स्त्रियांवर अन्याय होतोच होता.
            मध्ययुगीन काळ हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा काळ होता. स्त्रियांनी त्यांनी त्यांचे योगदान दिले. पण पुढील काळात त्यांच्यावर अटी लादल्या गेल्या. 
         स्त्रियांचे स्वातंत्र्य कमी होत गेले. मुस्लिम राजवटीमध्ये स्त्रियांचे जीवन नरकमय झाले होते. 
         स्त्री सुरक्षिततेच्या नावाखाली सतीप्रथा, बहुविवाहपद्धती, बालविवाह, दासी प्रथा, पडदा पद्धती ,हुंडा पद्धती, संपत्तीवर अधिकार नसणे, शिक्षणाचा अधिकार नसणे इत्यादी अनेक बंधनांमुळे स्त्रियांचे जीवन संघर्षाने भरलेले होते.
         या राजवटीमध्ये स्त्रियांना कवडीमोल मानसन्मान सुद्धा नव्हता. स्त्री एखाद्या गुलामासारखी बनलेली होती. स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून गेले होते. स्त्री सुरक्षिततेच्या नावाखाली स्त्रियांवर अनेक बंधने लादली गेली.
         काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास स्त्रियांची परिस्थिती आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संपूर्णपणे लैंगिकतेकडे जाणार आहोत.
        स्त्रियांवर लादलेली ही गुलामगिरी भारतीय समाज व्यवस्थेत पुरुषप्रधान संस्कृती घट्ट रुजविण्यामध्ये काम खऱ्या अर्थाने या राजवटीत झाले. आजही भारतीय मानसिकतेमध्ये या प्रवृत्तीचा या संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.

   मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्य न्याय समता बंधुता याकडे विशेष लक्ष दिले. स्त्रियांना कुटुंबात मान सन्मान मिळावा म्हणून आदर्श निर्माण केला.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर त्यांची आई जिजाऊ यांचा प्रभाव होता. म्हणून समाजामध्ये स्त्रियांना तोच मान सन्मान मिळावा असे त्यांचे मत होते आणि तो मान शिवाजी महाराजांनी मिळून दिला.
       स्त्री सक्षमीकरण्याचे पहिले पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत रोवले गेले.

(4. Medieval Period:-


         During the medieval period, women had a place of honor.  He was recognized as a second class citizen.  The needs of women were considered based on their living conditions.  
        They were looked upon by profession.  Despite the tactful caste system of medieval times, women had their rights.  Sexual exploitation of women is less common.  However, injustice was happening to women.
       The medieval period was a time of progress.  Women also contributed.  But later conditions were imposed on them.
          The freedom of women was reduced.  Life of women became hell under Muslim rule.
 In the name of women's safety, Sati system, polygamy system, child marriage, slave system, pada system, dowry system, lack of right to property, lack of right to education, etc., made life of women full of struggle.
       In the name of women's safety, Sati system, polygamy system, child marriage, slave system, pada system, dowry system, lack of right to property, lack of right to education, etc., made life of women full of struggle.
        Women were not even respected in this regime.  The woman was made like a slave.  Freedom of women was taken away.  Many restrictions were imposed on women in the name of women's safety.
       Barring a few exceptional examples, the situation of women and the attitude towards women will be completely sexualised.
       This slavery imposed on women really worked during this regime to firmly entrench the patriarchal culture in the Indian social system.  Even today, the influence of this culture can be seen in the Indian mentality. 

          During the medieval period Chhatrapati Shivaji Maharaj paid special attention to women's freedom, justice, equality and brotherhood.            Created role models for women to get honor and respect in the family.
 Chhatrapati Shivaji Maharaj's personality was influenced by his mother Jijau.  
           Therefore, they were of the opinion that women should get the same respect in the society and that respect was given by Shivaji Maharaj.
         The first step of women empowerment was planted during the rule of Chhatrapati Shivaji Maharaj.)


5. इंग्रजी राजवट/English Rule :-

      भारतामध्ये इंग्रजी राजवटीची सुरुवात झाली तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रियांची जाणीव त्यांची परिस्थिती त्यांचे कष्टमय जीवन इत्यादी विषय प्रकर्षाने जाणवू लागले.
        इंग्रजांची उदारमतवादी धोरण स्त्री पुरुष समानता,शिक्षणाचा अधिकार, समाजजागृती, सामाजिक मुक्त विचारसरणी, भारतीय समाज व्यवस्थेला खुणावत होती.
       भारतामध्ये शिक्षणाचा उदय झालेला होता. त्यामुळे स्त्रियांनी अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार प्रकर्षाने समाजाला दिसू लागला. त्यामुळे अनेक समाज सुधारकांनी त्याविरुद्ध लढा सुरू केला.              पारंपारिक विचारसरणीला विरोध करत सामाजिक चातुर्यवर्णव्यवस्थेविरुद्ध अनेक आंदोलने मोर्चा करून न्याय मिळवून दिला. 
     स्त्रियांना स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे. त्यांना जगण्याचा अधिकार आहे. स्त्री म्हणजे चूल आणि मुल संकल्पना कमी होत होती.


(5. English Rule:-

        When the English rule started in India, the real sense of women, their condition, their hard life etc. started to be strongly felt.
        The liberal policy of the British was marked by equality between men and women, right to education, social awareness, free social thinking, Indian social system.
        Education was emerging in India.  Therefore, injustice and oppression of untouchables by women became visible to the society.  So many social reformers started fighting against it.  
          Opposing the traditional ideology, many movements were marched against the caste system and brought justice.
        Women have an independent personality.  They have the right to live.  The concept of woman as hearth and child was waning. )


6. स्वातंत्र्यपूर्व काळ:-

         19 व्या शतकामध्ये इंग्रजी राजवटीमुळे समाज प्रवृत्ती मध्ये अनेक बदल होत गेले. सामाजिक संरचना बदलत गेली. शिक्षणामुळे समाजात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.
         इंग्रजी राजवटीच्या मुक्त विचारसरणीमुळे खऱ्या अर्थाने स्त्रियांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होत गेली. निसर्गाने पुरुषाप्रमाणे आपल्यालाही अधिकार दिले आहे. आपण निर्जीव वस्तू नाही व लैंगिक अत्याचार शोषण सामाजिक अनिष्ट रुढी प्रथा परंपरा सांभाळणारी वस्तू नाही तर निसर्गाने पुरुषांना जे स्वातंत्र्य दिले ते स्वातंत्र्य स्त्री म्हणून मलाही मिळाला हवे असे मत समाज मान्य होत होती.
         चूल मूल घर कुटुंब यासाठी उपयोगी असणारा शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता इंग्रजी शिक्षणाचा फायदा सर्वांगीण विकासासाठी करण्यासाठी तत्कालीन समाजातील स्त्रियांनी शिक्षणाचा उपयोग केला.          त्यात पंडिता रमाबाई कानिटकर काशीबाई रानडे या स्त्रियांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.
             महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाच्या लिंगांच्या यामध्ये भेद न करता खुल्या स्त्री शिक्षणाचा पाया रोवला आणि सावित्रीबाई फुले यांना पहिली महिला शिक्षिका म्हणून स्त्री शिक्षणाचा वसा त्यांनी घेतला आणि संपूर्ण भारतभर यशस्वीपणे  राबविला. 

       शाहू फुले आंबेडकर या चळवळीमध्ये स्त्रियांनी योगदान दिले.

         लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्त्रियांना प्रमुख योगदान दिले. त्यांना त्यांच्या लढा सहभागी करून घेतले. 
         आपला अस्मितेला आणि प्रतिभेला जागेल अशी कामगिरी करून स्वातंत्र्य लढत आपले योगदान दिले. इतिहासात त्यांचे योगदान कुठेतरी डावलले गेले आहे.
         स्वातंत्र्यलढ्यात खऱ्या अर्थाने स्त्रियांना समानतेचा अधिकार देण्यात आला. स्वातंत्रता बहाल करण्यात आली.त्यांना त्यांच्यातील प्रतिभेला वाव दिला. प्रेरणा दिली.
        सविनय कायदाभंग चळवळ सत्याग्रह आंदोलने मोर्चा इत्यादी मध्ये स्त्रियांना सहभागी करून घेतले.
        1857 च्या उठावापासून ते 1947 पर्यंत स्वातंत्र्य मिळणे पर्यंत स्त्रियांनी आपले योगदान दिले. हा कालखंड स्त्रियांच्या गौरवशाली कालखंड म्हणून उल्लेख केला जातो.
       विशेषता 1920 ते 1947 चा कालखंड इंग्रजांशी संघर्ष करीत असताना लाख मोलाची कामगिरी स्त्रियांनी केली.


(6.  Pre-Independence Period:-

               In the 19th century, many changes took place in the social trend due to the British rule.  The social structure changed.  Due to education, the attitude towards women in the society changed.
                  The free thinking of British rule made women realize their rights in real sense.  Nature has given us rights like men.  The society accepted the opinion that we are not a lifeless object and not an object that maintains sexual abuse, exploitation, social undesirable customs and traditions, but the freedom that nature gave to men, I should also get the freedom as a woman.
               The women of the society at that time used education to take advantage of English education for all-round development, not limited to education which is useful for the hearth, child, home, family.  Pandita Ramabai Kanitkar Kashibai Ranade women are mainly mentioned in it.

           Mahatma Jyotiba Phule laid the foundation of open women's education without discrimination of any religion, caste, creed, gender, and Savitribai Phule as the first female teacher, he took the credit of women's education and implemented it successfully all over India.

               Women contributed to Shahu Phule Ambedkar movement.

            Lokmanya Tilak and Mahatma Gandhi made major contributions to women in the freedom movement.  Involved them in their fight.
           He contributed to the freedom struggle by performing his identity and talent.  His contribution has been left somewhere in history.
           Women were truly given equal rights during the freedom struggle.  Freedom was granted and they were given scope to their talents.  inspired.
 Women participated in Civil Disobedience Movement, Satyagraha Movement, Morcha etc.
         From the uprising of 1857 to independence in 1947, women contributed.  This period is referred to as the glorious period of women.
        Attributes During the period from 1920 to 1947, during the struggle with the British, women made a million achievements.)

7. स्वातंत्र्योत्तर कालखंड:-
( Post-Independence Period:-)

        स्त्रियांच्या दुय्यमतेचा कालखंड हा खूप वर्षांपूर्वींचा नव्हता. जवळपास तीनशे - चारशे वर्षांपूर्वीचा असावा. अगदी कमी वर्षांमध्ये स्त्रीने प्रगतीचा विकास ग्राफ गाठला.
        स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील त्यांनी दिलेला योगदानामुळे स्वातंत्र उत्तर कालखंड ही त्यांची जमेची बाजू ठरली. सामाजिक सुधारणा, सामाजिक व्यवस्था, प्रगतीच्या वाटा बदलत चाललेली सामाजिक मानसिकता आणि भारतीय राज्यघटना यामुळे हा प्रवास खूपच सोयीचा झाला.
        संघर्ष होता; पण स्वातंत्र्य ही होते. मुक्तपणे स्त्री शिक्षणाचा पाया घट्ट असल्यामुळे कधी संघर्ष तर कधी कुटुंब सांभाळून घर संसार सांभाळून 21व्या शतकातील स्त्रीचा प्रवास झालेला आहे.
           शिक्षण हे पहिले पाऊल! खुल्या मुक्त विचारसरणीच्या समाजातील होय. त्यांनी स्वतः पुरते कोणतेही क्षेत्र मर्यादित ठेवले नाही. इतर समाजातील स्त्रीवर्गापर्यंत हे वारे वाहून नेले.                  पंखांना बळ दिले. समर्पणाची भावना कर्तृत्व जबाबदारी या खांद्यावर घेत स्त्रियांनी तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास केला. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपले योगदान दिले.
           स्त्रीने दडपणशाही हुकूमशाही पुरुषप्रधान मानसिकता यामध्ये सार्वजनिक स्तरावर आत्मविश्वासाने जीवनशैली जगण्याची सर्व मंत्र शिकली आणि अजूनही शिकत आहे.                सुरक्षिततेचा प्रश्न असतो, सर्वांनाच असतो. सर्व येणाऱ्या संघर्षावर मात करत स्त्रीने सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. देत आहे.        
         स्वातंत्र्योत्तर काळ म्हणजे स्त्रियांच्या सुवर्ण अक्षराने लिहावा इतका चांगला इतिहास स्त्रियांसाठी आहे. या इतिहासाच्या जोरावरच आजची स्त्री खंबीरपणे उभी आहे.
 

(7. Post-Independence Period:-

 The era of women's subordination was not so long ago.  It should be around three hundred - four hundred years ago.  In very few years women have reached the development graph of progress.
 His contribution in the pre-independence period made the post-independence period his success.  Social reforms, social order, changing social mentality and the Indian constitution made this journey very convenient.
 There was conflict;  But it was freedom.  Due to the strong foundation of free education for women, the journey of a woman in the 21st century has been a journey of sometimes struggling and sometimes taking care of the family and home life.
 Education is the first step!  Yes in an open free thinking society.  He did not limit himself to any area.  This wind carried to the women class of other societies.  Wings strengthened.  
         Taking the spirit of dedication and responsibility of achievement, women traveled to technology.  He contributed at national and international level.
 A woman has learned and is still learning all the mantras of living a confident lifestyle in public in an oppressive authoritarian patriarchal mindset.  Security is a concern for everyone.  Overcoming all the coming struggles, women have contributed in all fields.  is giving
 The post-independence period is a good history for women to be written in the golden letters of women.  Today's woman stands firmly on the strength of this history.)

8. भारतीय संविधान /भारतीय राज्यघटना:- 
Constitution of India /Constitution of India
         भारतीय स्वातंत्र्यलढ्याची चळवळ जगाच्या इतिहासात मानवतेच्या मुक्तीचा लढा ठरलेला आहे. या चळवळीने फक्त एक गुलामगिरी नष्ट केली नाही तर सामाजिक गुलामगिरी सुद्धा संपुष्टात आणले परंपरेने गुलाम बंदिस्त झालेली भारतीय स्त्री सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्ती चळवळीमध्ये समाविष्ट होते.
          भारतातील विषमतेला भारतीय वर्णव्यवस्था जातीव्यवस्था विभिन्नस्तरावर होती. तसेच स्त्रीमुक्तीच्या प्रश्नालाही बाबासाहेबांनी तेवढेच महत्त्व दिलेले होते. स्वातंत्र्याच्या जाहीरनामा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," लग्नानंतर ही पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे. ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये मुलगा मुलगी असा भेदभाव करू नये. मुलींना शिक्षणाच्या स्वाभिमानाने व स्वातंत्र्य पद्धतीने जगण्यास शिकवावे स्त्रियांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप ठरत असते. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री शिक्षणाचा विचार मांडून स्त्री शिक्षणावर जोर दिला."
     स्त्रियांना समाजा समानतेचा दर्जा मिळावा त्यांची प्रतिष्ठा वाढावी म्हणून 21 सप्टेंबर 1951 रोजी लोकसभेत हिंदू कोड बिल मांडले ते लोकसभेत मान्य न झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
       त्यांचे स्पष्ट मत होते की, ही स्वातंत्र्य व्यक्ती आहे. जेव्हा भारतीय राज्यघटना तयार होत होती तेव्हा बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने काही मते मंजूर करून घेतले आणि हेच कायदे आज स्त्रियांच्या प्रगतीचे स्तंभ आहे. आज भारतातील स्त्री वर्ग आनंदी सुखी प्रगतिशील आहे ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानातील तरतुदीमुळे.                    भारतीय राज्यघटनेमुळे भारतीय राज्यघटनेत दिलेल्या तिच्या अधिकाऱ्यांमुळे ज्या स्त्रीला चूल  मुल आणि घरातील उंबरठा या संकल्पनेमध्ये गुंतवून ठेवले होते. ती स्त्री आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे.                   जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्री यशस्वीतेचा झेंडा रोवलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचे बाबासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरत आहे. भारतात आणि जगातील प्रत्येक क्षेत्रात ती दिसत आहे.
         आधुनिक काळात स्त्रियांची वाटचाल आशादायक आहे बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे हे गोड फळ आहे. भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी जे योगदान दिले ते महान व श्रेष्ठ आहे.

       कधी कधी प्रश्न पडतो, भारतीय राज्यघटना इतकी परिपक्व असताना सुद्धा स्त्रियांवर अन्याय होतोच. स्त्री सुरक्षिततेचा प्रश्न येतोच. हुंडाबळी ऍसिड हल्ला अत्याचार शोषण बलात्कार इत्यादी स्त्रियांवर होतच आहे, पण असे का? 
        एक स्त्री म्हणून सुरक्षितेचा अधिकार हा तिचा प्रथम अधिकार आहे. ती आज त्या क्षेत्रात पोहोचलेली आहे. तिथे नवनवीन तंत्रज्ञानाचा नवनवीन टेक्नॉलॉजीचा नवनवीन विचारसरणीचा नवनवीन समाज संस्कृतीचा भाग होत आहे.
            फक्त काही मूठभर बुरसटलेल्या मानसिकतेमुळे स्त्रियांचे स्वातंत्र्य तिचे अधिकार समानतेचे सर्व हक्क बंदिस्त संकुचित करत आहे. ही मानसिकता बदलायला हवी. समाजातील ही मानसिकता फक्त ती व्यक्ती स्वतःमध्ये परिवर्तन करून बदलू शकतो.
        म्हणून स्त्री ही एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे. तिला माझ्यासारखेच सर्वाधिकार आहे. हे मान्य करावे लागेल त्या बुरसटलेल्या मानसिकतेला.            "भारतीय संविधान स्त्रीला सुरक्षितता प्रधान करते हेच मूल्यवान देणगी स्त्रियांना बाबासाहेबांनी बहाल केलेली आहे."

        तंत्रज्ञानाच्या या युगापर्यंत स्त्रीयत्त्वाचा प्रवास हा लेख लिहायला घेतला, तेव्हा वाटले तंत्रज्ञानाच्या या युगापर्यंत स्त्रीचा प्रवास हा फक्त तिने केलेल्या संघर्षाचा इतिहास नव्हता. या संघर्षामध्ये अनेक पुरुषांनी वेळोवेळी सामाजिक सुधारणा करून स्त्रियांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.
        यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे योगदान मोठे आहे. कारण बाबासाहेबांनी राज्यघटनेने स्त्रियांना लिखित अधिकार दिले नसते तर आज स्त्री तंत्रज्ञानाच्या या युगापर्यंतचा प्रवास करू शकली नसती हे सत्य आहे.                         स्त्रियांच्या प्रगतीचा इतिहास ज्यावेळी सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल तेव्हा बाबासाहेबांचे योगदान हे स्त्रियांसाठी दैवत्वाचे असेल.

(8.Constitution of India /Constitution of India:-

          The Indian freedom struggle movement has become a struggle for the liberation of humanity in the history of the world.  This movement not only abolished one form of slavery but also ended social slavery Indian women who were traditionally enslaved were also included in Dr. Babasaheb Ambedkar's human liberation movement.
       Inequality in India Indian caste system was at different levels.  Babasaheb also gave equal importance to the issue of women's liberation.  Dr. Babasaheb Ambedkar says in the Declaration of Independence, "After marriage, a wife should be a housewife with equal authority to a man. She should not be a slave of her husband and should not discriminate between boys and girls. Girls should be taught to live with self-respect and freedom. The progress of women is measured by the progress of that society."  For this, Dr. Babasaheb Ambedkar put forward the idea of ​​women's education and emphasized on women's education.
 The Hindu Code was passed in the Lok Sabha on 21 September 1951 to give equal status to women in the society and to increase their dignity.


He clearly believed that this is a freedom person.  When the Constitution of India was being drafted, Babasaheb passed some laws in stages and these laws are the pillars of women's progress today.  Today, women in India are happy and progressive only because of the provisions of Babasaheb's constitution.  The Indian Constitution enshrined the woman in the concept of hearth, child and threshold of the home due to her authorities given in the Indian Constitution.  That woman has reached every corner of the world today.  The flag of women's success has been planted at the global international level.  Babasaheb's dream of equality between men and women is coming true.  It is seen in India and every region of the world.
 The progress of women in modern times is hopeful, this is the sweet fruit of Babasaheb's tireless efforts for women.  Dr. Babasaheb Ambedkar's contribution for women is great and great in the history of India.

 Sometimes the question arises, is the Indian Constitution so mature?
         Right to safety as a woman is her first right.  She has reached that area today.  There, new technology, new technology, new thinking, new society is becoming a part of culture.
 Only a handful of rotten minds are curtailing women's freedom by barring all their rights to equality.  This mentality should be changed.  This mentality in the society can be changed only by the person changing himself.
         So a woman is a free person.  She has the same rights as me.  It has to be accepted by that rusty mentality.  "Indian constitution gives priority to the safety of women which is a valuable gift given by Babasaheb to women."

         When I decided to write this article, the journey of woman to this age of technology, I felt that the journey of a woman to this age of technology was not just a history of her struggles.  In this struggle many men have made social reforms from time to time and the journey of women has been till date.
         Dr. Babasaheb Ambedkar has contributed a lot in this.  Because if Babasaheb had not given written rights to women in the constitution, it is true that women today would not have been able to travel to this age of technology.  When the history of women's progress will be written in golden letters, Babasaheb's contribution will be divine for women.

9. आधुनिक स्त्री/ Modern Woman:-


       आधुनिक स्त्रीचा विकासाचा आराखडा तयार करताना प्राचीन स्त्रीचा विचार करणे गरजेचे आहे. महिला सक्षमीकरण संकल्पनेचा उगम मानव जातीच्या इतिहासातील स्त्री जातीवरील अन्यायातून झालेला आहे.
         स्त्रियांचे झालेले शोषण यातून स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचला गेलेला आहे. स्त्रीमुक्ती कडे वाटचाल करावी या भूमिकेतून अनेक स्त्रीवादी चळवळी उदयास आला. या परिवर्तनाच्या प्रवासात म. कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील ,लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, रमाबाई, अहिल्यादेवी होळकर ,जिजाऊ माता, असे अनेक नावे घेता येईल.
         त्यांनी त्यांची चळवळ यशस्वीपणे पुढे नेले. आधुनिक स्त्री आज सर्वांगीण विकास करीत आहे. ही या चळवळीच्या यशोगाथेमुळे!!!          आधुनिक स्त्री समाजकारण ,राजकारण, प्रशासन ,अर्थकारण या वेगवेगळ्या क्षेत्रात फक्त पुरुषाचे कर्तव्य बजावीत नाही तर भारतीय इतिहास बदलावीत आहे.
           आधुनिक स्त्री नवनवीन क्षेत्रात प्रगती करीत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात तिची स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. प्राचीन काळातील हिरमुसलेली बंदिस्त स्त्री आता ताट मानेने समाजात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहे.
          जगाच्या कानाकोपऱ्यात बदलते वारे स्वतःकडे घेत आहे. सक्षमीकरणाचा एक मोठा टप्पा तिने गाठलेला आहे. नवनवीन शोध शिक्षणाची संधी समानतेचा अधिकार यामुळे आधुनिक स्त्री जीवनशैली मॉडन झालेली आहे.           आधुनिक समाज स्त्रियांवर आता रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा अहंकार अनिष्ट जातीपातीच्या पद्धती कंपल्सरी करीत नाही. समाज व्यवस्थेने ही नवविचाराची खास धरलेली आहे.
           सार्वजनिक क्षेत्रात मुक्तपणे स्त्री वावरत आहे. स्त्री कायदा शिक्षण क्रीडा आरोग्य पत्रकारिता साहित्य प्रशासन राजकारण तंत्रज्ञान संशोधन विभाग सुरक्षा विभाग आर्मी यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत आपले नाव उंच करीत आहे.
          आधुनिक स्त्री आई पत्नी ताई मुलगी या नात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून काम करत आहे. इतिहासाच्या रंगमंचावर उमटणारा कर्तृत्व स्त्रियांना आधुनिक समाज रचना मोठा मान सन्मानाने कौतुक करीत आहे. संस्कृतीचा वारसा घेऊन आधुनिक स्त्री समाजाचा दृष्टिकोन बदलविता आहे. आधुनिक स्त्री यशस्वीतेचा या पायऱ्यांवर एकेक पायरी चढत आहे.
         तंत्रज्ञानाच्या युगात  नवज्ञानाला स्पर्श करून आपली प्रगती करीत आहे. गरुड झेप घेत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्री स्वतःचे अस्तित्व निर्माण करीत आहे. प्रत्येक स्त्री आपापल्या परीने या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. कारण त्यांना माहित आहे त्यांचा इतिहास, गुलामगिरीचा!!             आज या मुक्त वाऱ्यांमध्ये गुलामगिरीचे ते वारे वाहतात ना आपल्याकडे आले तर त्यांना कसे दडपणाखाली ठेवायचे हेही कला आता आधुनिक स्त्रीने स्वतःमध्ये शिकलेली आहे. आधुनिक स्त्री मशाल आहे पेटती. आधुनिक स्त्री तो सूर्य आहे तो कधीही माळवत नाही.       सामाजिक प्रवृत्तीच्या रंगांच्या दुनियेत आधुनिक स्त्री तो रंग आहे.
         ती माऊली आहे. ती ताई आहे. ती बहिण आहे. ती पत्नी आहे. ती आजच्या प्रगतीची ढाल आहे. आधुनिक स्त्री प्रत्येक घराघरात आहे. आधुनिक स्त्री आजी आहे आई आहे आणि ती स्वतःही आहे.

9. Modern Woman:-

 It is necessary to consider the ancient woman while preparing the development plan of the modern woman.  The concept of women empowerment originates from the injustice done to women in the history of mankind.
 The foundation of women empowerment has been created from the exploitation of women.  Many feminist movements emerged from the position that we should move towards women's liberation.  In the journey of this transformation, M.  Karve, Karmveer Bhaurao Patil, Lo.  Tilak, Gopal Ganesh Agarkar, Mahatma Phule, Savitribai Phule, Chhatrapati Shahu Maharaj, Ramabai, Ahilya Devi Holkar, Jijau Mata are many names.
 He carried his movement forward successfully.  Modern woman today is developing holistically.  This is because of the success story of this movement!!!  Modern women are not only performing the duties of men in different fields of social work, politics, administration, economy, but are changing Indian history.

The modern woman is advancing in new fields.  It has created its own identity in this age of technology.  The cloistered woman of ancient times is now making her own place in the society with a straight neck.
 Taking on the winds of change in every corner of the world.  She has reached a major milestone of empowerment.  Innovations, education opportunities, equal rights have revolutionized the lifestyle of modern women.  Modern society no longer imposes traditional customs, traditions, superstitions, egos, undesirable caste practices on women.  The social system has a special hold on innovation.
 Women are moving freely in the public sphere.  Women Law Education Sports Health Journalism Literature Administration Politics Technology Research Department Security Department Army UPSC is raising its name in competitive exams like MPSC.

A modern woman is working with the responsibilities of mother, wife and daughter relationships.  The achievements of women on the stage of history are appreciated by the modern society.  By inheriting the culture, the attitude of modern women is changing.  The modern woman is climbing each step on this ladder of success.
 In the age of technology, we are making progress by touching innovation.  The eagle is soaring.  Women in urban and rural areas are creating their own existence.  Every woman is trying her best for the development of this society.  Because they know their history, of slavery!!  Today, in these free winds, the winds of slavery blow, but if they come to us, the modern woman has learned the art of keeping them under pressure.  The modern woman is a torch burning.  The modern woman is the sun that never sets.  The modern woman is that color in a world of social trend colors.
        She is Mauli.  She is Tai.  She is a sister.  She is the wife.  It is the shield of today's progress.  Modern woman is in every household.  The modern woman is a grandmother, a mother, and she is herself.

 10. तंत्रज्ञान युगातील स्त्री:-

         गेल्या दोन दशकांचा प्रवास महिलांचा पाहिला तर मात्र तंत्रज्ञान आणि महिला या विषयावर मोठ्या प्रमाणात विचार केला गेला आहे. भारतामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये विज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाला आहे.               इंग्रजी भाषेच्या शिक्षण प्रणालीमुळे आणि वाढते इंग्रजीचा वापर रोजगारांची संधी जागतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आधारित असल्यामुळे आज कुटुंबाचा कल  नवनवीन पद्धतीने शिक्षण देण्यास मुलांना मुलींना सुरुवात केली. आजच्या विज्ञान युगात जवळपास सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.
         पुरुषाच्या मागे राहून केलेली प्रगती, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून केलेली प्रगती आणि आता पुरुषांसोबत राहून त्यांच्यातली एक होऊन केलेली प्रगती, यामागे तंत्रज्ञानाचा खूप मोठा हात आहे.
             भारतात स्वातंत्र्यानंतर विचार केल्यास तंत्रज्ञानाच्या विकासामुळे महिला संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. रोज एक नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. संशोधन होत आहे. महिला जास्तीत जास्त यामध्ये सहभागी होतात. काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्याच लागतात.
            प्रगती जितकी होते तितके संघर्ष ही असतात. महिला सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक तांत्रिक इत्यादी सर्वच मध्ये आपल्या सहभाग नोंदविता आहेत. त्यांना संघर्ष करावाच लागतो आहे.
          लैंगिक अत्याचाराच्या बातम्या सतत येत असतात. आता स्त्रिया स्वयंभू झालेल्या आहे. स्वकर्तृत्ववान झालेल्या आहे.
         विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे इंटरनेटच्या माध्यमांमुळे जग जवळ आलेले आहे.  स्त्रीने उंच भरारी घेतलेली आहे. त्या आता कुठेच कमी पडत नाही. तरीही तिला संघर्षाला समोर जावेच लागते .तंत्रज्ञान युगात स्त्री सगळीकडे दिसत असली तरी एक स्त्री म्हणून तिला किती स्वीकारले जाते याकडेही लक्ष द्यावे लागेलच.             कारण परिस्थिती खूप कठीण आहे. महिलांना हवे तितके अजूनही या क्षेत्रात सांभाळून घेतले जात नाही. महिला बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उच्च पदावर जातात. तरीपण त्यांना त्यांच्या जबाबदारी कर्तव्य अधिकार यापासून वंचित ठेवले जाते.
(If we look at the journey of women in the last two decades, the issue of technology and women has been largely considered.  Various branches of science have emerged in India in the last two decades.  Due to the English language education system and the increasing use of English, employment opportunities are globally and internationally based on knowledge of technology, today families tend to start educating boys and girls in innovative ways.  In today's scientific age, women are at the forefront of almost all fields.
 Technology has a huge hand behind the progress of being behind men, the progress of standing shoulder to shoulder with men and now the progress of being with men and becoming one with them.
 Considering the post-independence India, women are at the fore in the field of research due to the development of technology.  A new technology is being developed every day.  Research is being done.  Women mostly participate in it.  Some things have to be taken seriously.
 As much as there is progress, the struggle is…)

          संशोधन क्षेत्रापासून त्यांना वंचित ठेवले जाते पण एक गोष्ट विसरायला नको संशोधन हे स्त्रीने केले या पुरुषाने संशोधन हे यशस्वी होणे महत्त्वाचे! कारण विज्ञान तंत्रज्ञान  हे विचारत नाही की तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे. हा शोध पुरुषांनी लावला की स्त्रियांनी लावला. तो शोध यशस्वी होणे महत्त्वाचा असतो.
 त्या संशोधनामुळे सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचा असतो. विकसित दृष्टिकोन असणे महत्त्वाचा असतो.
           तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये गुणवत्तेत वाढ झाली आहे. मुलींना मुलांसारखाच दर्जा आता प्रत्येक घरात दिला जातो. "काही अपवाद अजूनही आहे." अजून त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचलेलेच नसावे म्हणून तर गर्भात मुलींना मारले जाते. 
         स्त्रीवर कौटुंबिक हिंसाचार केला जातो. मुलींचे शोषण केल्या जाते. मानव तस्करी केली जाते आणि मुलींना तिच्या हक्कांपासून दूर ठेवले जाते. पण हे काहीच अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे.
           कारण चारही बाजूने समानतेचे वारे वाहत आहे. स्त्री पुरुष समानता आता प्रत्येक क्षेत्रात आहे आणि ही जागृती फक्त विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे समाजमान्य झालेली आहे.



          प्राचीन काळापासून जे काहीच थोडेफार स्वातंत्र्य महिलांना मिळाली त्याचे सोने महिलांनी केले. स्वातंत्र्य उत्तर काळानंतर मिळालेल्या अधिकाराचा वापर त्यांनी आपल्या देशाच्या विकासात हातभार लावून केला. हे जरी काही लोक मान्य करत नसले तरी विकासाचा आराखड्यात हे मान्य होतेच.
             तंत्रज्ञानाचा वेध घेत स्त्रियांनी प्रगती केली. बदलत्या वाऱ्यांबरोबर बदलत विज्ञानाची कास धरले. तंत्रज्ञानाच्या जोडीला गुणवत्तेची जोड दिली.
          स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले. शेतीविषयक ज्ञान घेऊन प्रायोगिक तत्वावर शेती सुद्धा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, नापिकी शिक्षणाची जोड नसलेल्या स्त्रियांनी सुद्धा स्वबळावर नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पारंपारिक शेतीचा सरमिसळ करून शेती फुलविली.
        शेती फुलविता फुलविता त्यांनी त्यांचा विकास केला. ऑफिसमध्ये जाणारी स्त्री सकाळी पाच ते रात्री 11 चा प्रवासा रोजचा!
          स्त्री घरातून बाहेर पडली आणि प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले.
       कधी स्त्री शिक्षिका, कधी डॉक्टर, कधी इंजिनियर, कधी संशोधक, कधी लेखिका, कधी पत्रकार,कधी डॉक्टर, कधी नर्स, कधी अंगणवाडी सेविका, कधी अंगणवाडी मदतनीस, कधी आशा, कधी बचत गट चालविणारा गट, कधी मजूर, कधी कचरा गोळा करणारी, तर कधी चार चाकी ओढत भाजीपाला विकणारी, तर कधी चहाच्या कॅन्टीन वर तर कधी भोजनालय चालवणारी, कधी रेस्टॉरंट हॉटेल चालविणारी, कधी पावभाजींच्या गाडीवर ,कधी सुरक्षा विभागात तर कधी बँकेत,                     कधी...... कधी ......तर कधी........ हा गणिताचा पाढा कधीही न संपणारा. कारण स्त्रीने त्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. तिथे ती स्वकर्तृत्वाने पोहोचलेली आहे.                  कधी संसाराचा गाडा पुढे चालविण्यासाठी तर कधी स्वप्नाच्या वाटेवरून चालण्यासाठी पंख तिने प्रत्येक वेळेस स्वतःला लावून घेतले आहे. कधी स्वखुशीने तर कधी परिस्थिती समोर हतबल होऊन पण स्त्री कधीही हरली नाही.
            ती प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देतच आहे. मग ती अशिक्षित स्त्री असो वा शिक्षित स्त्री असो तिच्या वाटेला आलेले सकाळी पाच ते संध्याकाळी 11 चा प्रवास हा कधी न संपणारा. तरी ती हसतमुखाने या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे स्थान मजबूत करीत आहे. 

( Sometimes a woman teacher, sometimes a doctor, sometimes an engineer, sometimes a researcher, sometimes a writer, sometimes a journalist, sometimes a doctor, sometimes a nurse, sometimes an Anganwadi worker, sometimes an Anganwadi helper, sometimes Asha, sometimes a group running a self-help group, sometimes a laborer, sometimes a garbage collector,  Sometimes selling vegetables on a four-wheeler, sometimes on a tea canteen, sometimes running a restaurant, sometimes running a restaurant, sometimes on a vegetable truck, sometimes in the security department, sometimes in a bank, sometimes...  ........ This is a never-ending lesson in mathematics.  Because women have contributed in each of those fields.  She has reached there on her own.  Sometimes to drive the chariot of the world forward and sometimes to walk on the path of dreams, she has applied herself every time.  Sometimes willingly and sometimes desperate in front of the situation, but the woman never lost.
 She continues to contribute in every field.  Whether she is an uneducated woman or an educated woman, her journey from 5 am to 11 pm is never-ending.  However, she uses this technique with a smile...)

       त्यांना प्रोत्साहन द्या! स्त्रीने स्त्रीला प्रोत्साहन दिले तर त्या प्रोत्साहनाला बळ मिळेल. 
          एकदा कर्तव्याची माळ पूर्ण करताना इतिहासाच्या मंचावर स्त्रीचा इतिहास सर्वश्रेष्ठ असेल आणि हे सर्व प्राचीन स्त्रियांपासून चालू झालेला प्रवास आजच्या आधुनिक स्त्रीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या गौरवशाली आहे.
       खरं सांगायचं तर, लिहिताना खूप मुद्दे राहून गेले. जितके लिहिता आले तितके लिहिले असेच म्हणावे लागेल. कारण स्त्री ही कोणत्याही शब्दात संपूर्णपणे मांडता येत नाही. तिचं संघर्ष कोणत्या शब्दात मांडता येत नाही.
          कोणत्याही काव्यात मांडता येत नाही तरी अशी एक व्यक्ती आहे ती कधीही पुरुषप्रधान संस्कृतीला समजू शकत नाही. ती फक्त त्याच व्यक्तींना समजते ते स्वतः समानतेच्या वाऱ्यांसोबत चालण्याची हिंमत करतात.
          स्त्रीची आजपर्यंतचा प्रवास हा एकट्या स्त्रीच्या खांद्यावरून झालेला नाही यामागे अनेक समाज सुधारकांचा हात आहे. या हाताची कधीही मोजणी केली गेली नसली तरी स्त्री ही त्या प्रत्येक हातासाठी ऋणी आहे.(Thanks you💕) त्यांच्या ऋणानमुळे आज ती आकाशात झेप घेत आहे.
          प्राचीन काळापासूनच्या स्त्रियात्वाचा तंत्रज्ञान युगापर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक प्रगतीचा आहे. प्रत्येक स्त्रीला आरशासारखा स्वच्छ आणि पारदर्शक ही प्रगती मान्य आहे. तंत्रज्ञानाचा विकसित समाजाचा ती भाग होणार आहे. 
        तळागाळापर्यंत हे तंत्रज्ञान विकसित स्वरूपात जाणार आहे. स्त्री त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी करून घेणारच आहे. 
          पर्यायाने  स्त्री सामाजिक विकासाच्या या विकासामध्ये आपले योगदान योग्य पद्धतीने देत आहे. स्त्री देवीचे रूप आहे. स्त्री मातृत्वाची देण आहे. स्त्री आपुलकीची खाण आहे. स्त्री माऊली आहे.  स्त्री सामाजिक संरचना पुढे नेणारी आहे. 

(Alternatively, women are giving their contribution in the right way in this development of social development.  Stree is the form of Goddess.  A woman is gifted with motherhood.  A woman is a mine of affection.  The woman is Mauli.  A woman is a mover of the social structure.)

( There is no world without women.... There is no world without men.. Society has to accept this now.  Because nature has given equal rights to both.  It is a glorious history that due to some reasons the progress of women was hindered but now women are making their progress on their own initiative.  Step by step, woman has even brought the world closer to her hands.  A woman is a woman.  Whether she is ancient or modern or open-minded in the age of technology, she is a woman...!

 "Full of magic
 Full of faith
 full of dreams".❤)

         स्त्री शिवाय जग नाही.... पुरुषाशिवाय जग नाही...... हे आता समाजाला मान्य करावे लागेल. कारण निसर्गाने दोघांनाही समान अधिकार दिलेला आहे. काही कारणास्तव स्त्रियांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला पण आता स्त्री स्वकर्तुत्वावर आपली प्रगती करत आहे हा गौरवशाली इतिहास आहे.                        पायऱ्या पायऱ्यांवर स्त्रीने अगदी आपल्या हातात जग जवळ केले आहे. स्त्री स्त्री आहे. ती प्राचीन असो आधुनिक असो वा तंत्रज्ञान युगातील खुला मुक्त विचाराची असो ती स्त्री आहे...! 

"मायेने भरलेली 
विश्वासाने फुललेली 
स्वप्नांनी भरलेली".❤


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       महिला दिनविशेष यासाठी लिहिलेला हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपले मत आवर्जून लिहा. त्या मतांवरच माझ्या लिखाणाची देखणी चूक असल्यास माफी असावी. चुका सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या दुरुस्त केल्या जाते. तुमचे मत स्वातंत्र्य अंतिम असेल. धन्यवाद!!!!

-------------------------------------
 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

       If you like this article written for Women's Day, please like it, share it and write your opinion in the comment box. If there is any mistake in my writing, then please forgive me. Also tell me the mistakes in the comment box and they will be corrected. Your freedom of opinion will be final.  Thank you...!!
-------------------------------------
# महिला दिन महिला दिन विशेष आंतरराष्ट्रीय महिला दिवस जागतिक महिला दिवस मराठी लेख मराठी कविता स्त्री विश्व स्त्रीचे योगदान स्त्रीच्या चालू घडामोडी तंत्रज्ञान युगातली स्त्री तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत स्त्रीयत्त्वाचा प्रवास स्त्री शक्तीचा विजय महिला दिवस महिला दिनविशेष

Women's Day Women's Day Special International Women's Day World Women's Day Marathi Articles Marathi Poetry Women World Contribution of Women Current Affairs Women in the Age of Technology Journey of Feminism to the Age of Technology Victory of Women's Day Women's Day Women's Day Special.

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मंगळवार, ७ मार्च, २०२३

जागतिक महिला दिवस :- स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रगतीचे पहिले पान...!!

      जागतिक महिला दिवस :- स्त्रीच्या अस्तित्वाच्या प्रगतीचे पहिले पान...!! 

"International Women's Day Front page of the progress of woman's existence...!"
         ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


       जागतिक महिला दिवस म्हणजे स्त्रियांसाठी महत्त्वाचा दिवस. महिला दिवस आपण 8 मार्चला साजरा करतो. हा दिवस स्त्रियांवरती अत्याचार,अन्याय दूर व्हावा, त्यांना सुरक्षित आयुष्य मिळावे, स्त्री म्हणून ताठ मानेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे यासाठी केला जातो.
         जवळपास एका शतकाहून जास्त कालावधी हा दिवस मोठा जल्लोषाने संपूर्ण जगात साजरा केला जातो.
 ( For more than a century, this day has been celebrated all over the world with great fervor.)

       महिला दिवस  स्त्रीवादी विचारांचा पहिला जाहीर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या 
तत्ववेत्तीने लिहिलेल्या A Vindication of the Rights of Woman (1792 ) या पुस्तकातून झालेला आहे. 

           " स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करूनच केली जाते. त्यामुळे पुरुषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वतःला मनापासून का आवडते हे ठरवून निर्णय घेण्याची सोडाच,  त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते".

("The education and development of a woman is basically done with the thought of maintaining male dominance. Therefore, what men like is imprinted on her mind under the name of 'culture', but she loses the ability to think about it, let alone decide why she likes herself from the bottom of her heart".)

      
          1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागलेले होते. 
    तसेच एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन यांनी "विमेन्स राईट्स कन्व्हेन्शनची स्थापना केली 
       स्त्रियांना नोकरी करता यावी,विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून "मरियन हाईनिश" त्या ऑस्ट्रियन महिलेने लढा उभारला.

      तसेच "केट शेफर्ड", यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्युझीलँडच्या "सुफ्राजेट", कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारलेला.
     
        कोपेनहेगन मध्ये 1910 मध्ये महिला परिषदेत ही कल्पना मांडण्यात आली आणि 17 देशातील शंभरहून अधिक महिलांच्या कल्पनेमधून हा दिवस मान्य झाला.
       त्यानंतर डेन्मार जर्मन ऑस्ट्रेलिया इथे हा दिवस साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस आठ मार्चला साजरा केला जातो. 1975 मध्ये महिला दिवसाला जागतिक राष्ट्राची अधिकृत मान्यता मिळाली.

          स्त्री ही स्वातंत्र्य व्यक्ती आहे आणि तिला सर्व अधिकार मिळावे यासाठी हा लढा दिला जातो.
         स्त्री म्हणजे स्वातंत्र्य व्यक्ती आहे हे जगाच्या कोणत्याही कानाकोपरामध्ये मान्यता दिली जात नव्हती. स्त्री म्हणजे गुलाम. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच एका वस्तू सारखा होता. स्त्रियांना इतर व्यक्तींसारखे अधिकार मिळावे म्हणून 17 व्या शतकापासून स्त्रियांसाठी चळवळी उभ्या केल्या गेल्या काही ठिकाणी स्त्रियांना थोडेफार महत्त्व होते.
       हे महत्त्व खऱ्या अर्थाने, "श्री चक्रधर स्वामी" यांच्या महानुभाव पंथात दिसून येते. त्यांचा पंथ समानतेच्या पायावर उभा होता. महिलांना धार्मिक स्वातंत्र्य सर्वप्रथम महानुभाव पंथाचे संस्थापक यांनी दिले.
         19 व्या शतकात जगभर स्त्रीवादी चळवळीचा चळवळ उभारली गेली. भारताने त्या सहभाग घेतले. भारतात इंग्रजी राजवट असताना सुद्धा भारतामध्ये अनेक समाजसुधारकांनी जगात सुरू असलेल्या स्त्रीवादी चळवळीला भारतात सुद्धा उभी केली. त्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रानडे आगरकर टिळक  कर्वे. छत्रपती शाहू महाराज,रमाबाई रानडे अहिल्याबाई होळकर इत्यादी अनेक नावे आपण घेऊ शकतो.

(In the 19th century, the feminist movement was established around the world.  India participated in it.  Even during the British rule in India, many social reformers in India raised the ongoing feminist movement in India as well.  Among them Mahatma Phule, Savitribai Phule, Doctor Babasaheb Ambedkar, Ranade Agarkar Tilak Karve.  We can take many names like Chhatrapati Shahu Maharaj, Ramabai Ranade Ahilyabai Holkar etc.)


         भारतीय समाज व्यवस्थेत बालविवाह विधवाविवाह,स्त्रीशिक्षण, विवाहाचे वय पुनर्विवाह, केशवपण अशा विविध अनिष्ट चालीरीतींना विरोध केला.
        जागतिक स्तरावर स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जोर घेत होती तितके जास्त प्रमाणात स्त्रियांच्या अधिकाराबद्दल भारतात बोलले जात होते. 
      स्त्री ही एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे. तिलाही अधिकार आहे. तिच्या अधिकाराबद्दल समाज जागृत होत होता. इंग्रजी राजवटीमुळे भारतीय व्यवस्थेतही बदल होत होते. स्वातंत्र्याचे वारे भारतातही वाहत होते.
         याच पार्श्वभूमीवर रमाबाई रानडे यांनी भारतात प्रथमच महिला परिषदेची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी अनेक समस्या विविध प्रश्न आणि स्त्रिया बद्दलची अवहेलना मांडल्या.                  स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून पहिल्यांदा भारतात 1943 मध्ये "महिला दिवस",साजरा करण्यात आला. भारतात महिलांची परिस्थिती ही दयनीय होतीच पण स्त्री स्वातंत्र्य व्यक्ती आहे याकडे सुद्धा दुर्लक्ष होते.            स्त्रियांच्या विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,धार्मिक, विविध समस्या असल्या तरी त्या समस्या नव्हत्याचमुळे असे समाजमान्य झाले होते. म्हणून भारतात अनेक समाज सुधारकांनी आपापल्या परीने या समस्यांना समाजामध्ये मांडला.
           भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या अधिकाऱ्यासाठी भारतीय संविधानामध्ये मान्यता दिली. स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला. स्त्री ही पुरुषांची गुलाम नसून स्त्री सोबती आहे.
           निसर्गाने स्त्री पुरुष असा भेदभाव केलेला नाही. स्त्रीला सुद्धा पुरुषांसारखे ते सर्व अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाले आणि आजही स्त्रियांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रगतीसाठी भारतात विविध योजना राबविल्या जातात.

   आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त दरवर्षी ठराविक संकल्पनेवर आधारित असते
यावर्षी म्हणजे 2023  महिला दिवसासाठी संयुक्त राष्ट्राची थीम डीजी ऑल - संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी अशी आहे. 
      जगभरात ज्या महिला तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षणात जे योगदान देत आहे ते ओळखून यथोचित सन्मान करावा म्हणून ही थीम होय. 

( International Women's Day is celebrated every year based on a certain concept
 This year, 2023, the UN theme for Women's Day is DG ALL - Using Research and Technology for Gender Equality.
 The theme is to recognize and honor the contribution women are making to technology and online education around the world.)


     डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होत हे ही शोधण्याचा एक प्रयत्न या थीम मागे असावा.
         या विषयाच्या अनुषंगाने समाज जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात.
        
        2023 म्हणजे जागतिक महिला दिनाचे 111 वे वर्ष. या इतका मोठा प्रवासा जागतिक महिला  दिवसाचा ही प्रगतीच्या उत्तुंग शिखरावर पोचलेली आहे.
       घरात स्त्री म्हणजे फक्त गुलामीचे किंवा दुर्लक्षित घटक म्हणून राहिले नाही तर ती आता आई,बहिण ,ताई ,काकू ,मावशी, आत्या फक्त इतक्याच नात्यात अडकलेली नाही तर शिक्षक, टीचर ,डॉक्टर, पायलेट, वकील, नर्स,पत्रकार, लेखिका. जिल्हाधिकारी /कलेक्टर,राजकारण मुख्यमंत्री, राष्ट्रपती, मंत्री अशा विविध पदांवर त्या पोचलेल्या आहे.


        ( 2023 marks the 111th year of International Women's Day.  This long journey has reached the pinnacle of progress of International Women's Day.
         A woman is no longer just a slave or a neglected element in the house, but now she is not only a mother, sister, uncle, aunt, aunt, grandmother, but also a teacher, teacher, doctor, pilot, lawyer, nurse, journalist, writer.  She has held various posts like Collector/Collector, Politics Chief Minister, President, Minister.)

      " जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी," हे वाक्य या मागचा उद्देश, या मागचे ध्येय आता संपूर्ण अर्थाने पूर्ण होत आहे.
        जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने संपूर्ण जगाच्या महिलांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांनी केलेल्या उंच भरारी बद्दल आणि त्यांनी घर सांभाळून केलेली प्रगती यासाठी त्यांच्या पाठीवर आशीर्वादाची थाप आहे.
         ज्या व्यक्तीने हा दिवस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात यावा म्हणून केलेल्या अथक परिश्रमाच्या स्वप्नांच्या सत्यावत उतरलेले स्वप्न आहे.
       इतिहास कधीही बदलत नाही इतिहास बदलविणारे खूप येतात पण इतिहास टिकून ठेवणारे व्यक्ती, काही प्रसंग कधीही कोणीही मिटवू शकत नाही.
        त्यातलाच एक इतिहास म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा पहिला लढा आणि वर्तमान स्थितीत असलेला स्त्रियांच्या प्रगतीचा आराखडा.

(History never changes. There are many people who change history but there are people who preserve history. Some events can never be erased by anyone.
 One such history is the first struggle for women's freedom and the blueprint for women's progress as it stands today.)

 


प्रगतीच्या वाटा नवनवीन येऊ दे 
गरुड झेप घेता घेता 
सुरक्षितेची चाहूल सोबत राहू दे 
नवीन तंत्रज्ञानाच्या युगात समानतेचे 
वारे सोबत राहू दे 
मी एक स्त्री आहे कधीही न विसरणारी
कारण संस्काराने बांधली गेलेली 
तरी प्रगतीच्या वाटा खुल्या करत 
खुला विचाराने खुल्या व्यासपीठावर 
प्रगतीची वाट सोबत राहू दे 
मी आई ताई बहीण आत्या मावशी 
काकी बायको सर्वच नाते सांभाळत 
सोबत राहू दे माझ्या 
तुझ्या पुरुषार्थमधील शिवाजी शाहू फुले आंबेडकर...!!
  ( Let innovation be part of progress
 The eagle takes a leap
 May the safety be with you
 Equality in the age of new technology
 Let the wind be with you
 I am a woman who never forgets
 Because it is bound by culture
 Still opening the way for progress
 Open platform with open mind
 May progress be with you
 I am mother, father, sister, mother and aunt
 Aunt wife takes care of all relationships
 Let me be with you
 Shivaji Shahu Phule Ambedkar in your Purushartha...!!  )

          जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तुम्ही या वर्षी कशा पद्धतीने हा दिवस साजरा केला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


-------------------------------------
    #महिला दिवस #जागतिक महिला दिवस #आंतरराष्ट्रीय महिला दिवस #महिला दिन #महिला दिनाच्या खास कविता #महिलांसाठी कविता

#womensday #internationalwomensday #internationalwomensday #womensday #womensdayspecialpoems #poemsforwomen
-------------------------------------

सोमवार, ६ मार्च, २०२३

होळी चारोळी

रंगांचा खेळ रंगताना मन रंगून जाते  
रमून जाते मनसोक्त बालपणीच्या 
आठवणी बालमन होऊन!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



------------------------------------
तुझ्या रंगात रंगून जायचे 
रंगांच्या सोबतीने  
आयुष्याच्या संगतीने...!!❤
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote



       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

-------------------------------------

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

चारोळी

आत्मविश्वासाने नाते जुळले पण 
सहानुभूतीने ते अधिक घट्ट झाले 
स्पर्श तुझ्या प्रेमाचा अनोळखी भेटीचा
माझ्या ओलावल्या मनाच्या सहानुभूतीने

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


=============================

#महाराष्ट्र माझा#Maharashtra My

      महाराष्ट्राचा इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहावा इतका अभिमानाने भरलेला आहे. म्हणून आता आपल्यापासून सुरुवात करायची आहे हे जपण्यासाठी...!!
       याच भावविश्वातून आशायसंदर्भातून ही कविता. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
        कविता स्वलिखित व स्वरचित आहे. चूक असल्यास माफी असावी. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा..!!

** महाराष्ट्र माझा **

महाराष्ट्राचा इतिहास 
शूरवीरांचा 
संविधानाच्या निर्मितीचा 
शाहू फुले आंबेडकर परंपरेचा 
आता महाराष्ट्राचा 
इतिहास 
माझा मी जोपासलेल्या 
संस्कृती परंपरेचाच 
फक्त!!

    ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

        The history of #Maharashtra is so full of pride that it should be written in golden letters.  So now we have to start with us to preserve that...!!
 This poem is about hope from this spirit world.  Don't forget to like and share if you like.
           The poem is self-written and composed.  Apologies if there is a mistake.  Be sure to share your opinion in the comment box..!!

    #Maharashtra My

 History of Maharashtra
 of knights
 Creation of the Constitution
 Shahu Phule Ambedkar tradition
 Now of Maharashtra
 History
 I cultivated mine
 Cultural tradition itself
 Only!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

       Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

 ============================

#Maharashtra My#Maharashtra My


--------------------------------------------------------------------------

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

पहिले प्रेम

" पहिले प्रेम "

अबोलीच्या शब्दांनी थरथरत्या मनाने 
           व्याकूळ हृदयाने....!!

      प्रेमाच्या वाटेवर रंग भारी असतात. दोघांच्या नजरामध्ये बोलकेपणाची चाहूल असते. धाडस जिव्हाळा उमलत्या भावनेला बोलकेपणाची हितगुज असते.
       आठवणींची साठवण असते. क्षण विसरून जातात आठवणी गोळा करता - करता. जळमट नसलेली भावना सुंदर वळणावर आयुष्याच्या नवीन पहाट घेऊन येतात. उगाच वाटत पंखाना बळ आले..... आकाश रंगविण्यासाठी..!!                  जोडलेल्या दाट स्तब्ध आठवणींना रडता ही येत नाही आणि जवळही ठेवता येत नाही. फक्त रमते हसऱ्या गोजिरवाण्या फुलासारखे भरलेल्या अंगणांसारखे. वाफवलेल्या पाण्याच्या वाफेसारखे.
        सुखदुःखाची किनारे हरवलेले तरीपण पिंजऱ्यात नसण्याची भावना मनात दाटून येते. शब्दांची गरज का वाटत नाही वेदनेची जाणीव होत नाही सोन्यासारख्या मनाला फक्त धावणाऱ्या पाखरांची तितकी आठवण असते. 

        प्रेम ही किती नाजूक भावना आहे हे कळते. आपली नाते दाट हसऱ्या फुलांसारखे असावे. 
       खोट्या शब्दांची चाहूल नसावी. फक्त हसऱ्या गालावर हसऱ्या प्रीतीची चाहूल असावी  परिपूर्णता काय असते,माहीत नसलेल्या मनाला उन्हातही सावली शोधावी लागत नाही कारण प्रेमच सावली असते.
         पहिले प्रेम म्हणजे मनाचा कोऱ्या पानावर नवीन शब्द भावना संवेदना निर्माण करणारी जाणीव असते. कोऱ्या मनावर कौतुकाची छाप असते.
         सौंदर्याने सजलेल्या मनावर प्रकाशाची चाहूल असते. सौंदर्य मनाचे विश्वासाने भरलेले पहिले प्रेम ...!! हृदयामध्ये श्वासामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करते.
       आई-वडिलांनी जीवापाड जपलेल्या आपल्या मनावर कुणीतरी अधिराज्य निर्माण करीत असते. नवीन शब्द नवीन भावना नवीन स्पंदने नवीन सुहास नवीन शब्दांची एक सुरेख मैफिल आठवणींच्या स्वरूपात अभ्यासासोबत येत असते.
       रंगबावऱ्या मनाला फुललेले झाड आणि मनसोक्त आपल्याच हसऱ्या मनाला नवविश्वास घेऊन येते. 
     पहिल प्रेम विसरणे त्यामुळेच कठीण जात असावे. हृदयाच्या एका कोपऱ्यात नवसाचा पणती सारखे अखंड जळत राहते आठवणींच्या स्वरूपात...!!

      कधी कधी लिहिताना माझ्याही मनातल्या काही आठवणी त्या आता विसरल्या गेल्या आहे तरी त्या डोकावून पाहतात.
       प्रेम आनंदी मनाला आनंदित करून जाते. प्रेमाची भाषा न कळता वयात पहिले प्रेम होते. मनातल्या भावना काय असतात हेही माहीत नसणाऱ्या आपल्या भावनांना गुलाबी नवीन पहाट काय माहित असेल.
      अशा वयात पहिले प्रेम जीवनात येते. नात्यात घट्ट बांधून ठेवते आणि मनातील भावनेला उगवता सूर्यासारखा रंगीबेरंगी करून जाते. मावळतीच्या सूर्याचा प्रकाश समुद्राच्या लाटा सारखा बेभान करून जाते.
      पहिल प्रेम म्हणजे ती सवय आयुष्याच्या शेवटी ही आपल्या सोबत असते पहिल प्रेम मनाच्या मैफिलीत सुरेल सप्तस्वर...!❤

        लिहिता लिहिता काही आठवणी अशा डोळ्यांसमोर येऊन गेल्या. विश्वासाच्या नात्यावर प्रेम अवलंबून असते, अशी म्हणणारी मी आता पहिला प्रेमाबद्दल लिहिताना पहिला प्रेमात विश्वास अविश्वास यासारखे काही नसते असे वाटते.
      पहिल प्रेम म्हणजे वेड असावे. मनात विचारांची गर्दी नसते. हुरहुर नसते. स्पंदने नसतात. श्वासही आपला पुरताच असतो आणि मिठी आई पुरती...❤!
          त्यामुळे ज्या वयात पहिल प्रेम होत ते फक्त एक आकर्षण असते. त्या जवळीक नसते. दुरावा नसते. तरी पण ते  प्रेम असते आणि विशेष म्हणजे ते पहिल प्रेम असते...!❤❤               फुलत जातो.... हसत जातो.... मैत्रीची नवी भाषा कळते. आनंदाची नवीन भाषा कळते. मैत्री फुलली जाते. आयुष्याचे चित्र रेखाटले जाते. त्या पहिल्या प्रेमामुळे आणि असाच हळव प्रेम प्रत्येकांच्या अजाणत्या वयात त्यांच्यासोबत येते.
    पहिल प्रेम म्हणजे आकाशातील चंद्र तारे ओंजळीत आणून देणारे.  पहिल प्रेम म्हणजे लांब वरून बघताना गालावर आलेले हसू...... कोऱ्या मनावर बंदिस्त शब्दांचे चाहूल..... फक्त स्वतःसाठी त्यात मिलन नसते.... त्यात आपलेपणा नसतो......त्यात शांतताही नसते..... त्यात गार वाराही नसतो..... आणि त्यात उगवत्या सूर्यासारखा रंगीबेरंगी जगण्याची कल्पनाही नसते.... 
        तरीपण पहिल प्रेम दर्पण असते. आपल्या संस्काराचे पहिले प्रेम आरसा असतो. आपल्या जाणिवेचे पण पहिल प्रेम ओल्या आठवणीचा ओला सुगंध असतो. पहिल प्रेम अबोली असताना अंगणातली...!❤❤
        आयुष्याचा प्रवास चालू करणारी पहिली पायवाट असते असे मला वाटून जाते. कारण पहिल प्रेम प्रत्येकांच्या आयुष्यात येते आणि ते कसे असेल यावर आपले समोरचे आयुष्य ठरत असते.
        मुली फ्रॉग मधून ड्रेस मध्ये येत असताना भावनांची चलबिचल नैसर्गिक रित्या होत असते. मुले ही ना लहान असतात ना तरुण. आणि त्या भावनांवर प्रभुत्व मिळविणे एवढीच बुद्धिमत्ता आपल्याजवळ असते. आई सांगेल ते विश्व असणाऱ्या त्या वयात पहिला प्रेम होते. 
       अशा क्षणाला जर वारा निघून गेला; भावनेच्या भरात तर पाखरांना घरट मिळतच नाही पवित्र भावनेचे...!
        म्हणून पहिला प्रेमासाठी खूप सांभाळावे लागते. मनाला भावनेला उत्तेजनाला केविलवाण्या मनाला उभ्या असलेला आयुष्यातील सांजवेळेला आणि फांदी जाऊ नये निसर्गचक्राचे म्हणून घेतले जाणारे प्रयत्न, त्यात पहिले प्रेम होते .. !
         सांगा किती संघर्ष असतो, पहिला प्रेमासाठी !!किती भावनेच्या गणितांमधून जावे लागते. हे त्या व्यक्तीलाच माहीत असते. 
       पहिल प्रेम आठवणींच्या त्या कप्प्यात साठले जाते तिथे कोणीही जाऊ शकत नाही. कुणीही त्या आठवणी पुसू शकत नाही. पहिल प्रेम आकाशात भरारी घेणाऱ्या त्या पिलांसारख असते  ते पहिल्यांदाच आकाशात भरारी घेत असते. न त्याला या जगाचा रंग माहीत असतो ना त्याला तुटलेली फांदी माहिती असते.
        नात्याला उन्हाची चाहूल माहित असते फक्त त्याला ओढ असते उडण्याची उंच भरारी घेण्याची ...!

          पहिल प्रेम खरच अलौकिक भावना. गंमत - जंमत फक्त शब्दाविनाच. आयुष्यात पहिले प्रेम आले आणि आयुष्याला नवीन वळण आले माहित नाही त्याला पहिलं प्रेम म्हणायचे की नाही पण सकाळच्या सूर्यप्रकाशात बरोबर ते आले झोपेतून उठलेल्या त्या चेहऱ्यासोबत आले.       
       गोड गोड आठवणींचा खजिना देऊन गेले. प्रेमाची पहिली लाट येऊन गेली.... गुंतून गेली..... फुलवून गेली. सूर्यप्रकाशाच्या शांत वातावरणात भीतीचे सावट मागे ठेवून गेली.
         पण पहिला प्रेमात गुंतणे असे झालेच नाही. प्रेम होते त्या उमलत्या भावना होता त्या अजाणत्या वयात पण त्यात गुंतले झालेच नाही माहीत असताना हे समोरचा व्यक्ती जिवापाड गुंतलेला असताना खूप कठीण वेळ होती ती आरसा सारखा स्वच्छ हृदयाला नाजूक कोरीव काम त्यामुळे मोकळ्या मनाने केला.
          आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मनालाही त्या आठवणीत न रमू देणारे मी पहिल प्रेम लिहिताना ते प्रेम आटून गेले आता अस वाटत. माझी सावली मला हसत असावी कारण पहिल प्रेम त्या सावली सारख होत.
       कधी मागे तर कधी समोर अखेर संपलेल पानगळीसारख न परत उगवलेला न परत सुगंध मनात दळवळणार. त्याच हसू फक्त तितका आता लक्षात आहे. पण ते हसू आता हे मनाला प्रफुल्लित करून जाते. पहिला पावसाचा सुगंध मनात ओला होऊन जातो.
      ढगाळलेले वातावरण आता नयनात आणि मोकळा झालेल्या आठवणी मनाला टोचतात तरी पण मन फुलतात कळीसारखं फुलत गेले कारण ती पहिलं प्रेम होत ना! ओलांडलेल्या मर्यादा आणि सावलीची किंमत त्या पहिल्या प्रेमामुळे आपल्याला कळते हे विशेष.
        अभ्यासाची ओढ आणि लिखाणाची ओढ पहिला प्रेमामुळे मनात निर्माण झाली. माझा प्रत्येक शब्द निशब्द त्या पहिल्या प्रेमाची आठवण असते. कारण माझ शब्दच त्या विरहात निर्माण झालेल्या आहे. ते कधीही मी स्वतः स्वतःला मान्य केलेले नाही.
      प्रेम ही भावना फक्त शब्द पुरती मर्यादित नसते तर प्रेम हे भावना घट्ट आनंद झाला की मिठी मारलेला त्या क्षणासारखे असते पहिल प्रेम. 

हिरवळ पहिल प्रेम .....
सबुरी पहिल प्रेम.... 
मोरपीस पहिल प्रेम.... 
मोहक फुल पहिल प्रेम.... 
गवताची पाती पहिल प्रेम...... 
सजलेली पायवाट पहिल प्रेम.....  
हरवलेला विरह पहिल प्रेम.... 

           शिदोरी हळव्या भावनेशी पहिल प्रेम विखुरलेल्या आठवणींची पहिल प्रेम ❤💕!!

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
        लेख स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

============💔💔💔💔❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

उरात काटा

           *** उरात काटा ***

काळजात  रुततो तो काटा आठवणींचा 
उरात भरते धडकी ती थरथरला आठवणींची 

मनात काहूर हिरवळीच्या पालोपाचोळ्याचा 
मनात धडकी विसरणे अवघड त्याचा आवाजांची 

उगाच कहाणी माझी त्याच्या हदयाची 
उगाच पहाट माझी त्याच्या अबोलीची

व्याकुळ आठवणींचा झरा नजर ओली नसेल रोजनीशी तळहाताच्या रेषेत आठवणीत ओली

हरवून गेली रात्र आता उदासीन एक रेष होत 
पुन्हा न उधाण आता भिजलेली पहाट आता 


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


=============================



*** fork in the gut ***

 That thorn of memories is in my heart
 Memories fill your heart with fear and trembling

 In the mind, there is a lot of greenery
 It is difficult to forget the shock of his voice

 My story is about his death
 Early in the morning my aboli

 The fountain of anxious memories will not be wet in the eyes

 The lost night now became a sad line
 No rise again now wet dawn now


 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹


शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

smile smile स्मितहास्य

      एकतर्फी प्रेमाची ही गोष्ट...❤💔! पारिजातकाचे पुष्प उगवणे आणि गळणे यातील जो कालावधी असतो तसेच प्रेम. विशेषता एकतर्फी प्रेमाची ही गोष्ट आणि हे प्रेम विसरणे कठीण असते.
       .........  अश्रूंचा थेंब ही आता त्या व्यक्तीचा राहिला नाही कारण सर्व काही चोरून नेले...💔❤!! 
        कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा..!!


*** स्मित हास्य ***

तुझ्या स्मित हास्यानी 
काळीज माझ चोरल 
चोरी गेले माझ मन 
पण चोरू शकली नाही 
तुझे मन 

तुझ्या स्मित हास्याने 
हृदयाचे स्पंदन वाढले 
पण माझ्यास वाढलेल्या 
स्पंदनाने तुझे स्पंदन 
वाढलेच नाही 

तुझ्या स्मित हास्याने 
विचारांचा काहूर माजल 
नसलेल्या भावनेवर 
भावनाही उत्तेजित झाले 
पण तुझ्या भावनेमध्ये 
भावनाच निर्माण झाली नाही 
साधी आपुलकीची 

तुझ्या स्मित हास्याने 
सर्वच चोरून नेले 
कदाचित ,स्वप्नही चोरून नेले 
पण तुझ्यापर्यंत ते 
पोहोचलोच नाही 
ते स्मित हास्य इतिहास 
जमा झाले आता 

ते तुझ्यातील माणुसकीचे होते 
त्यावर रचलेली माझी रांगोळी 
कधीही रंगीबेरंगी नव्हती 
ती निर्माणच झाली होती 
रंगहीन होण्यासाठी 

पण काही क्षणासाठी का होईना 
तुझ्या स्मित हास्याने जगून 
गेले कधीही न जगलेले क्षण 
आणि जगण्याची आता 
पायवाटही ते स्मितहास्य 
चोरून गेले हृदयाचे ❤!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

        This story of one sided love...❤💔!  Love is the period between the flowering and falling of the Parijataka flower.  Attribution is the story of one-sided love and this love is hard to forget.
 .........  The teardrop is no longer that person's because everything has been stolen away...💔❤!!
          The poem is composed and handwritten.  Don't forget to like and share if you like.  Be sure to share your opinion in the comment box..!!


 *** smile smile ***

 Your smile
 Kalij stole me
 My mind was stolen
 But could not steal
 your mind

 With your smile
 Heart beat increased
 But I grew up
 Your vibration with vibration
 Not increased

 With your smile
 Kahoor Majal of thoughts
 On the feeling of not being
 Emotions were also aroused
 But in your spirit
 The feeling did not arise
 Of simple affection

 With your smile
 All stolen
 Perhaps, the dream was stolen
 But that's up to you
 Not reached
 That smile is history
 Collected now

 It was your humanity
 My rangoli designed on it
 It was never colorful
 It was created
 to become colorless

 But why not for a moment?
 Living with your smile
 Gone are the moments never lived
 And now to live
 Even the path is a smile
 Stolen heart ❤!!

         ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

==========================================================


# मराठी साहित्य #विद्रोही साहित्य #मराठी कविता #मराठी चारोळी #मराठी लेख #हिंदी #इंग्रजी #मराठी कविता #सुविचार #डायरी #दलित साहित्य #आयुष्य कविता #सकारात्मक कविता #नकारात्मक कविता इत्यादी लेख



#Marathi Literature #Rebellious Literature #Marathi Poetry #Marathi Charoli #Marathi Articles #Hindi #English #Marathi Poetry #Thoughts #Diary #Dalit Literature #Life Poetry #Positive Poetry #Negative Poetry etc.
=============================

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

* प्रामाणिकपणा *Honesty *

          ***  प्रामाणिकपणा  ***

         प्रामाणिकपणाची प्रत्येक वेळी किंमत मोजावी लागते. कारण प्रामाणिकपणा हा त्या संस्कारावर अवलंबून असतो; जो स्वतः स्वतःवर केलेला असतो. म्हणून प्रामाणिकपणाची किंमत कोणीही करू शकत नाही. किंमत करणारा एकदा जिंकतो पण प्रामाणिकपणा आयुष्याच्या त्या क्षणापर्यंत सोबत राहतो जिथे आयुष्य संपलेले असते आणि उगवता सूर्य वाटेला येणारही नसते तरीही तो कुठेतरी जागाच असतो.  
         प्रामाणिकपणा हा त्या कर्माच्या हिशोबा सारखा आहे, जे कर्म आयुष्याच्या नंतरही सोबत असते असे म्हणतात. कडुलिंबाची चव कधीही गोड होत नाही. साखरेची चव कधी कडू होत नाही. पाणी कोणत्याही रूपात असले तरी पाणी आपले स्वरूप बदलवतो पण गुण नाही तसेच प्रामाणिकपणा आहे.         
           प्रामाणिकपणा हा त्या माणसाचा आधारस्तंभ असतो. समोरचा कितीही फुगला स्वार्थाने अहंकाराने अविश्वासाने  कडू शब्दांनी तरी तो प्रामाणिकच असतो आणि प्रामाणिकपणाची किंमतच त्याला चुकवावी लागते.
                आयुष्याच्या अशा वेळेला जो वेळ त्याला सोन्याहूनही महत्त्वाचा असतो तरी प्रामाणिक माणूस प्रामाणिकपणे त्या वेळेला सोबत देत असतो.   हेच प्रामाणिकपणाचे जिंकणे असते आणि तो जिंकतोच..!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================



*** Honesty ***

 Honesty always pays.  Because sincerity depends on that culture;  Which is self-inflicted.  So no one can put a price on honesty.  The pricer wins once but honesty stays with him until that moment of life where life is over and the rising sun is nowhere to be seen.
 Honesty is like the reckoning of karma, which is said to follow after life.  The taste of neem is never sweet.  Sugar never tastes bitter.  In whatever form water is, water changes its form but has no quality, so does sincerity.
 Honesty is the pillar of that man.  No matter how much the front is inflated with selfishness, arrogance, mistrust, bitter words, he is honest and he has to pay the price of honesty.
      At such a time of life when time is more important than gold to him, an honest man spends his time honestly.  This is the winning of honesty and it wins..!
        ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================


 

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

मराठी चारोळी

सभोवताली फक्त जळकांचाच 
बाजार असावा असे कधी वाटले 
नाही पण डोळे उघडले आणि 
जळकांचा बाजार दिसला
=============================

Only fireflies around
Ever thought there should be a market No but eyes opened and
A flea market was seen

============================
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================

मराठी चारोळी

चुकूनही चुका न करणारे आपण 
तरी वर्तमानत फक्त चुकाच का दिसतात 
इतरांना की आपलाच गैरसमज हा 
चुकूनही चुका करत नाही
=============================

You are the one who never makes mistakes
 However, why only errors are visible at present
 This is a misunderstanding of others
 Does not make mistakes even by mistake
=============================


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================
#चारोळी #मराठी कविता  #मराठी साहित्य #दलित साहित्य #विद्रोही साहित्य

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

पहिली भेट

कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
      एखादी व्यक्ती प्रेमात पडते. तिच्या आणि त्याच्या पहिल्या भेटीचा हा पहिला आनंद.
     शब्द मांडण्याचा हा थोडाफार प्रयत्न..! त्या भाविश्वातही खूप नाजूक भावना लपलेल्या असतात.

** पहिली भेट **
न करता वळले हळुवार स्पर्श 
हा भेटीचा 
जो जरी आपला भासे मजला 
स्पर्शविण्याचा 
दोघातील एक जग सुर सापडे 
पुन्हा पुन्हा 
भाव भाबडा भाव सुरेला छंद जडला 
तुझ्या आठवणीचा 
पाहता पाहता सोबत चाले 
फुललेला फुलोरा 
आज दोघात स्पर्शविनाच भेट सारे 
वळणावरती
तरी भेटला स्वर्ग आनंदाचा वळले ना 
परी मज 
या भावनेचा ठेव सारा नाजूक भाव 
मनातील भावनेचा 
न कळता वळले हळुवार स्पर्श या भेटीचा
          ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


=============================

The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.
 A person falls in love.  This is the first joy of her and his first meeting.
 This is a little attempt to put words..!  There are very delicate feelings hidden in that prophecy too.

 **First Meeting**

 Turned without a gentle touch
 This is a visit
 Even if you don't like it
 to touch
 A world harmony was found in both
 Again and again
 Bhav bhabda bhav tune got stuck
 of your memory
 Let's go together
 A blossoming flower
 Don't touch twice today
 At the turn
 However, met heaven did not turn to happiness
 fairy me
 The deposit of this feeling is all delicate feeling
 of feeling in the mind
 The gentle touch of this visit turned without knowing
         ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================

आयुष्य गणित Life Math

          कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       आयुष्याची गणित मांडताना आयुष्य कसे असेल हे माहीत नसते. शून्यत्व हे आयुष्याचे पहिले गणित आहे आणि हे यशस्वी गणितामध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य पद्धतीने मांडावे लागते.
        याच भावविश्वातून ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!❤

** आयुष्य गणित **

हसता आले तर हसून घ्यायचे 
मनात रडू दाटून आले की रडून घ्यायचे 
आयुष्य गणित असेच असावे 
सहज भविष्याचे चित्र रेखाटून जाते 
कधी अश्रूच्या सोबत 
कधी हसण्याच्या स्वरूपात 
कधी एकटीचा प्रवासात 
फुल फुलेले रोजच
तसे उगवेल रोजच 
नवीन प्रवास 
फक्त 
आता आपल्याला आपले ठरवायचे आहे आयुष्याचे गणित मोजायची 
की आयुष्याचे गणित सोडवायचे 
काटे दोन्हीही पद्धतीमध्ये 
हसतानाही - रडतानाही 
हसता आले तर हसून घ्यायचे 
मनात रडू आले की.... !!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
 

💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔


      The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.
        When calculating life, one does not know how life will be.  Emptiness is the first math of life, and it has to be properly presented to turn it into a successful math.
      If you like this poem from this spirit, don't forget to like and share...!❤


** Life Math **

 If you can laugh, you want to laugh
 If you want to cry, cry
 Life should be like math
 A picture of the future is easily drawn
 Sometimes with tears
 Sometimes in the form of laughter
 Sometimes traveling alone
 Flowers are blooming every day
 It will grow every day
 A new journey
 only
 Now we have to decide our maths of life
 To solve the mathematics of life
 Forks in both methods
 Even while laughing - even while crying
 If you can laugh, you want to laugh
 When I want to cry...!!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

#जखमांचा बाजार#Market of Wounds (#गझल)

   कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
        कविता थोड्या वेगळ्या पद्धतीची. माहित नाही का सुचली? कोणत्या भावनेवर सुचली? तरी पण ती भावना कुठेतरी आज मनाच्या आतल्या कोपऱ्यात कुठेतरी वेदना देऊन जाते.       अशी ही भावना आहे ...!!!सुखाचे पान आणि दुःखाचे पान शोधता -शोधता आपण स्वतः स्वतःवर किती आघात करतो. स्वतःच स्वतःसाठी किती बाजार मांडतो. 
         कदाचित या भावनेला शब्दात शब्दबद्ध करण्याचे काम माझ्याकडून केले गेले. आयुष्याच्या रंगपटलावर अशा भावना व्यक्त केला जात नाही पण मनातच त्या भावना कुठेतरी व्यक्त केली जाते.
       ही भावना प्रत्येकाच्याच मनात असते. कुणाचे मन दुखल्यास माफी असावी. पण अशा भावना येत असेल व्यक्त सुद्धा व्हा ...!स्वतःशी का होईना 
....!!💔


*** जखमांचा बाजार****

मीच माझ्या मनावर घातलेला हा 
जखमांचा डाव जखमांच्या बाजारात हा

आनंदाच्या पानावरती डोलतात शब्द किनारा दगडांच्या वेदनेला मीच माझा शब्द आहे 

हसतात वारे हे माझ्याच जखमांना;जखमा 
ही न दिसे वाऱ्यांना त्या आजच्याच आहे 

तरी  दुःखांचे पाने वेदनाचा काटा चर 
रुततोस आहे शब्द किनारा ओलाच होत आहे 

मीच माझ्या जखमांवर घातलेला बाजारा आहे सुखाच्या पानावर दुःखाचा डोलारा हा आहे 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================


       The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.
 Poetry is of a slightly different style.  Don't know why?  Which emotion suggested?  However, that feeling somewhere in the inner corner of the mind today gives pain.  This is the feeling... How much damage do we inflict on ourselves as we search for the page of happiness and the page of sadness.  How much of a market does it market for itself?
 Perhaps I was tasked with putting this feeling into words.  Such feelings are not expressed on the screen of life but those feelings are expressed somewhere in the mind.
 Everyone has this feeling.  If someone's heart is hurt, there should be forgiveness.  But if such feelings are coming, express them too...! Why not with yourself?
 ...!!💔

** Market of Wounds ****

 I put this on my mind
 Wound trick is in the wound market

 Words sway on the page of joy I am my word to the pain of shore stones

 The winds laugh at my wounds
 It is the same as today

 But the leaves of sorrow are the thorn of pain
 Rutos is the word the shore is getting wet

 I am the bandage I put on my wounds

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.




 ============================


 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...